गरोदरपणात घ्यावयाची काळजी
• सात महिन्यापर्यंत दरमहा तपासणी, ८ व्या महिन्यात दर १५ दिवसांनी आणि ९ व्या महिन्यात दर आठवड्याला तपासणी करावी. आपल्या पूर्वीच्या आजारांची डॉक्टरांना नीट माहीती द्यावी. वैद्यकीय तपासणी बरोबर हिमोग्लोबीन, रक्तगट, लघवी, रक्तात साखरेचे प्रमाण व जरूर पडल्यास इतर अॅन्टी. एच. आय. व्ही. तपासण्या करून घेणे जरूरीचे आहे. • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे, आयर्न व कॅल्शियमच्या गोळ्या चालू ठेवाव्यात दररोज आंघोळ, स्वच्छ व सैल कपडे आणि सकस आहार ठेवावा, पाणी भरपूर प्यावे. गरोदर स्त्रीस हलका व्यायाम आवश्यक आहे. त्याने टवटवीत व उत्साही वाटते. रक्ताभिसरण सुधारते व स्वास्थ चांगल राहते. दिर्घश्वसन करावे, सकाळच्या मोकळ्या हवेत फिरावयास जावे, जड वस्तू उचलू नये, लांबचा प्रवास टाळावा, दुपारी २ तास व रात्री ८ तास झोप घ्यावी. उंच टाचेच्या चपला किंवा सॅन्डल्स् घालू नये. • सुरवातीच्या ३ महिन्यात व शेवटच्या २ महिन्यात संभोग टाळावा. शेवटच्या महिन्यात अंघोळीच्या वेळी स्तनाग्रे ओढून लांब करीत जावी म्हणजे प्रसूतीनंतर बाळाला सहज पाजता येईल. . धनुंबात प्रतिबंधक लस ६व्या ७व्या व ८व्या महिन्यात टोचून घ्यावी. क्ष-किरण (एक्स-रे) तपासणी व डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे. सोनोग्राफी तपासणीचा आई किंवा गर्भ यावर वाईट परिणाम होत नाही. दैनंदिन घरकाम वैगरेचा पडणारा ताण पुरेसा व्यायाम आहे. या सबबीखाली व्यायाम करणे टाळू नका.संपूर्ण गरोदरपणात आईच्या वजनात १० ते १२ किलो वाढ अपेक्षित असते.
आहार
• गरोदरपणात कोणतेही उपवास करु नयेत.• दररोज सकाळी व रात्री १-१ ग्लास दूध, जेवणात १ वाटी घट्ट वरण, १ वाटी पालेभाजी, फळभाजी, लिंबू कोशिंबीर, पोळ्या, भात किंवा खिचडी, दशमी, भाकरी, थालीपीठ, इडली, खमंग ढोकळा आवडीनुसार दही किंवा ताक घ्यावे.
गरोदरपणात खालील परिस्थितीत त्वरीत डॉक्टरांकडे जावे.
• पोटात दुखु लागल्यास अंगावर रक्त जाऊ लागल्यास • बाळाची हालचाल कमी जाणवत असेल किंवा अचानक बंद झाल्यास. . योनिमार्गातून अचानक पाणी जाऊ लागल्यास • पायावर, चेहऱ्यावर, अंगावर सुज येत असल्यास अतिशय जास्त प्रमाणात उलट्या होत असल्यास • तीव्रतेने डोके दुखणे, डोळ्यापुढे दिसेनासे होणे • झटके येणे.
प्रसूतीनंतर बाळाची काळजी
• बाळ जन्मल्यानंतर २ तासात बाळाला स्तनपान द्यावे. ते तुमच्यासाठी, बाळासाठी आणि दूध येण्यासाठी आवश्यक आहे. • पहिले दोन दिवस दूध पिवळसर असते ते दूध पिल्याने बाळाला पोषण होते शिवाय जंतू संसर्गापासून बाळाचा बचाव होतो.. • बाळाला दर दीड ते दोन तासाने व मागितले तसे (डिमान्ड फिडींग) पाजायला घ्या. कानात, बेंबीत तेल टाकू नये, • आपणहुन बाळ स्तन सोडेपर्यंत एका बाजूला पाजा जर त्याची भूक भागली नसेल तर दुसऱ्या बाजुला पाजायला घ्या. * आईच्या दुधात भरपुर पाणी असते त्यामुळे पहिले चार ते सहा महिने पर्यंत बाळाला वरचे पाणी देण्याची गरज नसते.
प्रत्येक महिन्यात वेळेवर तपासणीसाठी यावे. सुज येणे, चक्कर येणे व रक्तस्त्राव होणे, बाळाची हालचाल बंद होणे किंवा इतर विशेष तक्रारीसाठी केव्हाही व ताबडतोब आणि उपाशीपोटी येणे. तुमच्या रक्तगटाच्या दोन व्यक्ती तुमच्यासाठी केव्हाही रक्तदान करू शकतील अशी व्यवस्था ठेवा. त्यांचे पत्ते व फोन नंबर तुमच्या जवळ कायम असणे आवश्यक आहे. • सुदृढ बालकाला घेऊन सुखरुपपणे तुम्ही घरी जाल यातच आम्हाला आनंद आहे, त्यासाठी येथील स्टाफला मदत करा. • गैरसमज टाळण्यासाठी बिलासंबंधी अगोदर चौकशी करा. अडचण असल्यास प्रत्यक्ष डॉक्टरांशी बोला.
IMG_3633
Dr Kalyani Ghawate
Shirur

Contact Us

Address

CT Bora College Rd, behind Kilbil Hospital, Gujarmala, Shirur, Maharashtra 412210

error: Content is protected !!
Call Now Button